Loading...

आमच्या अकादमीची निवड का करावी? आमच्या व इतर संस्थांमधील फरक काय आहे?

सरस्वती विद्या अकादमी, ही दमाणी एज्युकेशन फाऊंडेशनचा एक विभाग आहे. ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एक संस्था आहे. लोणावळा, महाराष्ट्र येथील आमची सहशिक्षण निवासी CBSE शाळा, इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा पुरवते.

ध्येय

सरस्वती विद्या अकादमीचे शैक्षणिक तत्वज्ञान विद्यार्थ्यांना व्यापक, करिअर-केंद्रित शिक्षण पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते, येथे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले जाते. ज्यामुळे ते वैचारिक दृष्ट्या अधिक विकसित होतील आणि कोणत्याही परिस्थितीत, जगात कुठेही यश मिळवण्यासाठी, नैतिक मूल्ये आणि कौशल्ये ह्या बळावर विजयी होतील. शैक्षणिक, सौंदर्यदृष्टी आणि क्रीडा नैपुण्य ह्या सोबतच त्यांचे चरित्र घडविण्यावर आणि जीवन कौशशल्ये विकसित करण्यावर जास्त भर दिला जातो.

दृष्टीकोन

सुरक्षित आणि संरक्षित वातावरणात सर्वांगीण शिक्षण पुरवणे आणि भारताच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण, नेतृत्व आणि करुणा यांच्या माध्यमाद्वारे पिढीजात गरीबीच्या चक्रातून बाहेर येण्यासाठी सक्षम बनवणे.