सरस्वती विद्या अकादमी एक शिस्तबद्ध शैक्षणिक अभ्यासक्रम राबवते. ह्या अभ्यासक्रमात क्रीडा आणि पाठ्यक्रमाशिवाय इतर उपक्रमांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे सर्वांगीण बौद्धिक विकास झाल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतात तसेच परदेशात पुढील शिक्षणासाठी प्रवेश सुनिश्चित होतो. आमचे समावेशक आणि आदराचे वातावरण विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले जाते आणि सकारात्मक गट संवादाचे देखील शिक्षण मिळते. आमची शाळा धर्मनिरपेक्ष असून, विद्यार्थ्यांना सर्व धर्मांचा आदर करणे शिकवले जाते, तसेच समाजातील त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या यांची जाणीव देऊन, पर्यावरणाविषयी त्यांची जागरूकता वाढवते.
सरस्वती विद्या अकादमी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्यासाठी विविध सुविधा पुरवते. आमच्या कॅम्पसमध्ये आधुनिक शैक्षणिक विभाग, उत्तम सुसज्ज लायब्ररी, अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम्स आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताच्या विशेष प्रयोगशाळा (लॅब्स) आहेत. आमच्या कला आणि हस्तकला कक्षात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो; संगीत आणि इतर उपक्रमांसाठी असलेल्या स्टुडिओमध्ये विद्यार्थी स्वत:चे कौशल्य दाखवू शकतात किंवा नृत्यकला जोपासू शकतात आणि योग देखील करू शकतात. आमच्याकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी एक कौशल्य विकास लॅब आणि एक आरोग्यकक्ष देखील आहे. आमच्या ऍम्फीथिएटर /मल्टी-पर्पज हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डाइनिंग हॉलमध्ये आमच्या सुसज्ज स्वयंपाकघरात तयार केलेले पौष्टिक जेवण दिले जाते.
मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आरामदायक वसतिगृहांची सोय केली आहे. प्रत्येक वसतिगृहात वार्डन कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था केली आहे, तसेच शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. सरस्वती विद्या अकादमीमध्ये, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी समृद्ध, सुरक्षित व आशादायी वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो.
सरस्वती विद्या अकादमी विविध खेळांच्या मार्फत विद्यार्थ्यांना सक्रिय जीवनशैली जगण्याचे महत्व पटवून देते. आमचे विद्यार्थी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल इत्यादी रोमांचकारी व स्पर्धात्मक मैदानी खेळांचा आनंद घेतात. ह्या खेळांसाठी उत्तम राखलेली मैदाने निर्माण केली आहेत. सामन्यामध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होते. ह्याशिवाय स्व-रक्षणासाठी आम्ही मार्शल आर्ट्सचे देखील प्रशिक्षण देतो. ह्या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकाग्रता वाढते.
मैदानी खेळांची आवड नसणारे विद्यार्थी कॅरम आणि चेसच्या खेळांमध्ये भाग घेऊ शकतात. ज्यामुळे मानसिक कौशल्य आणि खिलाडू वृत्ती वाढते. ज्यांना अचूकता आणि एकाग्रता आवडते त्यांच्यासाठी आमचे धनुर्विद्येचा सराव करण्यासाठीचे मैदान परिपूर्ण सुविधा देते. विद्यार्थी लॉन टेनिस आणि टेबल टेनिसचे खेळदेखील खेळतात, ह्यामुळे मित्रत्वाची भावना निर्माण होते.
आम्ही सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यावर विश्वास ठेवतो, आणि आमचे खेळाचे उपक्रम संघभावना, सहनशीलता आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देतात.