Loading...

उज्ज्वल भविष्याची दिशा: सरस्वती विद्या अकादमी

सरस्वती विद्या अकादमी, ही शैक्षणिक संस्था, दमाणी एज्युकेशन फाऊंडेशनचा एक भाग आहे. महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे लोणावळ्यात वसलेली निवासी CBSE शाळा एकूण ३७ एकर हिरव्यागार परिसरात वसली असून, आमच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. आम्ही संपूर्ण महाविद्यालयीन तयारीसाठी अभ्यासक्रमाबरोबरच जागतिक दर्जाचे शिक्षण आणि खेळाच्या सुविधा देतो. आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना सृजनशीलतेने, विश्लेषणात्मक विचार करण्यास आणि तांत्रिकदृष्ट्या प्रवीणता प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळेल.
Read More

तरुण पिढीला सक्षम बनवणे: आमचे मोफत शिक्षणाचे ध्येय

सरस्वती विद्या अकादमीमध्ये आमचे एक स्पष्ट ध्येय आहे : पात्र विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण देणे., करिअर विकासास प्रोत्साहन मिळेल असे शिक्षण देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचे चरित्र घडविण्यासाठी आम्ही त्यांच्या जीवन कौशल्यावर आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करतो. आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी घडवतो. आमची शाळा केवळ एक संस्था नसून उज्ज्वल आणि आशादायक भविष्याचा एक मार्ग आहे.
Read More

उज्ज्वल भविष्यासाठी आजच अर्ज करा!

सरस्वती विद्या अकादमीमध्ये प्रवेश घेणे सोपे आहे. जर तुमचा मुलगा/ तुमची मुलगी सध्या सरकारी किंवा सरकार मान्यताप्राप्त शाळेत शिकत असेल आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुमचा मुलगा/ तुमची मुलगी सरस्वती विद्या अकादमीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहे.

×